सोलापूर महानगरपालिका मुख्यपृष्ठ

सोलापूर महानगरपालिका

महाराष्ट्र सरकार

मुख्यपृष्ठ
मदत पाहिजे का?
⌨ कळफलक नेव्हिगेशन सक्षम
अंतिम अद्यतन:

विभागीय कार्यालय क्र. ७

संपर्क माहिती

सोलापूर महानगरपालिका
इंद्रभुवन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,
रेल्वे लाईन्स, सोलापूर - ४१३००१
कार्यालयीन वेळ: सकाळी ९:४५ - संध्याकाळी ६:१५ (सोमवार - शुक्रवार)

विभागाची ओळख

विभागीय कार्यालय क्र. ७ हे सोलापूर महानगरपालिकेचे महत्त्वाचे विभागीय कार्यालय असून येथे पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते दुरुस्ती आणि इतर सार्वजनिक सेवांचे कार्य केले जाते.

५०००+
कुटुंबे सेवित
९८%
तक्रार निराकरण

कार्यप्रक्रिया

नळ जोडणी प्रक्रिया

१. अर्जदार २. कर निरीक्षक मत ३. कनिष्ठ अभियंता तपासणी ४. विभागीय अधिकारी मंजुरी

रस्ता खोदाई प्रक्रिया

१. शहर अभियंता अर्ज २. कनिष्ठ अभियंता तपासणी ३. शहर अभियंता मंजुरी ४. परवानगी जारी

माहितीचा अधिकार

फाईल माहिती स्वरूप आकार भाषा तारीख क्रिया

विभागीय माहिती अधिकार

विभागीय माहिती अधिकार दस्तऐवज

पीडीएफ १.२ एमबी मराठी जानेवारी १५, २०२३

विभागाची कार्ये

  • पाण्याच्या नळाला जोडणी देणे
  • सांडपाणी जोडणी देणे
  • अनधिकृत नळ जोडणीबाबत तक्रार
  • पाण्याच्या मीटरमध्ये बिघाड झाल्याची तक्रार
  • कमी पाण्याच्या दाबाबाबत तक्रार
  • रस्ता तोडण्याची परवानगी देणे
  • पाण्याच्या गुणवत्तेबाबत तक्रार
  • मॅनहोल कव्हरची देखभाल
  • रस्त्यांवर खड्डे भरणे
  • सार्वजनिक स्वच्छता तपासणी

नियम आणि कायदे

  • महाराष्ट्र महानगरपालिका कायदा, १९४९ च्या पाणीपुरवठा तरतुदींनुसार सेवा
  • महाराष्ट्र महानगरपालिका कायदा, १९४९ च्या तरतुदींनुसार सांडपाणी व्यवस्थापन
  • महाराष्ट्र महानगरपालिका कायदा, १९४९ च्या रस्ते बांधकाम तरतुदींनुसार सेवा
  • पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ अंतर्गत सेवा
  • जनस्वास्थ्य अधिनियम, १९४८ च्या तरतुदी

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

पाणी कनेक्शन

नळ जोडणीसोलापुर महानगरपालिका द्वारे दिली जाणारी कायदेशीर पाणी पुरवठा सेवा आहे.

अ) घरगुती वापरासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे १)मालकी दस्तऐवज (भाडेकरू असल्यास एनओसी), २)रेशनकार्ड /आधारकार्ड/रहिवास पुरावा व इंडेक्स व उतारा सोसायटी/इतर रहिवासी यांचे ना हरकत पत्र व सदनिका करारनामा . ३) मिळकत करामधील पाणीपट्‌टी व नळजोडाचे मीटरप्रमाणे होणारी पाणीपट्‌टी दोन्ही म.न.पा. कोषागारात विना तक्रारी भ्ररणा करणार याबाबत नोटराईज्ड हमीपत्र. ४)घर-कर पावती नाहरकत दाखला. ब) बिगर घरगुती वापरासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे अ. क्र. १ ते ४ ची कागदपत्रे १) शॉप अॅक्ट लायसेन्स्‌.२) इंडेक्स टू व दुकान खरेदीबाबत कागदपत्रे.३) दुकान/कार्यालय भाडयाने घेतल्यास भाडे करार, मुळ मालकाचे संमतीपत्र मुळ मालकाचे पाणी बीलाबाबत हमीपत्र.

उपभुखंड / सदनिका मालक किंवा भाडेकरू (मालकाच्या परवानगीने) वैध कागदपत्रे सादर करून अर्ज करू शकतात.

ऑनलाईन फॉर्म भरून आवश्यक कागदोपत्री सादर करावी. नवीन नळजोडकरिता करावयाचा अर्ज सोलपुर महानगरपालिका, www.solapurcorporation.gov.in या वेबसाईटवर अर्ज सादर करता येईल.

ड्रेनेज जोडणी

सोलापुर महानगरपालिका द्वारे दिलेली ड्रेनेज-लाईन (सीवर) प्रणालीशी जोडणी आहे

जागा / सदनिका मालक किंवा भाडेकरू (मालकाच्या परवानगीने) वैध कागदपत्रे सादर करून अर्ज करू शकतात.

१)ऑनलाइन फॉर्म भरून आवश्यक कागदोपत्री सादर करावी. २)नवीन ड्रेनेज कनेक्शन करिता करावयाचा अर्ज सोलपुर महानगरपालिका,www.solapurcorporation.gov.in या वेबसाईटवर अर्ज सादर करता येईल.

अ) जागा / सदनिका मालकी दस्तऐवज, ब) पत्ता पुरावा, आधार कार्ड, क) बांधकाम परवानगी, नकाशा (साइट प्लॅन).

परवाना अथवा ना हरकत प्रमाणपत्र

लाईन्स सर्व्हिसेस या टॅबमध्ये न्यु लायसन्स रजिस्ट्रेशन व एन. ओ. सी. फॉर लायसन्सड बिझनेस या टॅबवर क्लिक केल्यासा सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध आहे.

मागणी अर्ज भरताना दाखल केलेल्या मोबाईल क्रमांकावर व ई-मेल वर प्रकरण मंजूरीचा संदेश प्राप्त होतो.

मागणी अर्ज भरताना दाखल केलेल्या मोबाईल क्रमांकावर व ई-मेल वर शुल्क भरणेचा संदेश प्राप्त झाल्यानंतर त्यासोबत दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यास शुल्क भरण्याकरीता ऑनलाईन पर्याय उपल्बध होतात. (डेबिट/क्रेडिक कार्ड, इंटरनेट बँकींग व युपीआय द्वारे) त्यानुसार शुल्क भरणे.

ऑनलाईन कार्यप्रणालीवर शुल्क भरल्यानंतर परवाना रिप्रिंट या टॅब वर क्लिक करून अर्ज क्र. व मोबाईल नंबर नोंदविल्यास परवाना प्रत मिळते. तसेच ना हरकत प्रमाणपत्र प्रत नवीन टॅब मध्ये उपलब्ध होते. (ना हरकत प्रमाणपत्र ओपन होण्यासाठी पॉअप चालू ठेवावे.)





🔗 इतर सरकारी संकेतस्थळे