मुख्यपृष्ठ
मदत पाहिजे का?
⌨ कळफलक नेव्हिगेशन सक्षम
पृष्ठ अंतिम अद्यतन:

घनकचरा व्यवस्थापन विभाग

संपर्क माहिती

सोलापूर महानगरपालिका
सह्याद्री शॉपिंग सेंटर, राजाभाऊ पटवर्धन चौक, सोलापूर - ४१३००१
कार्यालयीन वेळ: सकाळी ९:४५ - संध्याकाळी ६:१५ (सोमवार - शुक्रवार)

विभागाची ओळख

घनकचरा व्यवस्थापन विभाग हा महानगरपालिकेचा महत्त्वाचा विभाग असून शहराची स्वच्छता, कचऱ्याचे संकलन, वाहतूक, प्रक्रिया आणि विल्हेवाट लावण्याची जबाबदारी सांभाळतो.

विभागाची मुख्य कार्ये

  • रस्ते, चौक, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करणे
  • घरोघरी कचरा संकलन
  • कचऱ्याची वाहतूक आणि प्रक्रिया
  • दुभाजक, सेप्टिक टँक्स स्वच्छ करणे
  • मोबाइल टॉयलेट्सचे व्यवस्थापन
  • बायोमायनिंग प्रकल्पांचे संचालन
  • स्वच्छता जनजागृती मोहिमा
  • बंदी असलेल्या प्लास्टिकवर नियंत्रण

माहितीचा अधिकार

फाईल माहिती स्वरूप आकार भाषा तारीख क्रिया

माहितीचा अधिकार कलम १ ते १७

माहितीचा अधिकार अधिनियम कलम १-१७ मराठीत

पीडीएफ १.२ एमबी मराठी जानेवारी १५, २०२३

सद्यस्थितीत सुरू असलेले प्रकल्प

बायोमायनिंग प्रकल्प

स्थान: तुळजापूर रस्त्यावरील जुने डंपिंग ग्राउंड (45 एकर)

एकूण खर्च: ₹23.03 कोटी

  • केंद्र शासन अनुदान: ₹7.60 कोटी
  • राज्य शासन अनुदान: ₹8.52 कोटी
  • सोलापूर महापालिकेचा हिस्सा: ₹8.00 कोटी

कार्यान्वयन यंत्रणा:

  • बायोमायनिंग: एम/एस सागर मोटर्स, लातूर
  • बायो-एनर्जी प्रक्रिया: बायो एनर्जी लिमिटेड, सोलापूर

योजना

स्वच्छ भारत अभियान

"घरगुती शौचालय" योजना

वैयक्तिक शौचालय बांधणीसाठी अनुदान दिले जाते. ही योजना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबविण्यात येते.

विभागीय उपकरणे व मालमत्ता

  • कचरा संकलन वाहने: १९२
  • कॅप्सूल युनिट्स: ८
  • मोबाईल शौचालये: १४
  • रिफ्यूज कॉम्पॅक्टर्स: १४
  • व्हॅक्यूम इम्प्टीअर्स: २
  • हुक लोडर्स: २
  • ट्रक: २
  • कचरा ट्रान्स्फर केंद्रे: ४

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

सेप्टिक टँक

सेप्टिक टँक हे जमिनीखाली असलेले एक टाकी आहे जिथे घरगुती सांडपाणी जमा होते. यातील घन पदार्थ खाली बसतात आणि द्रव पदार्थ पुढे प्रक्रिया होण्यासाठी जातात. हे एक प्रकारचे प्राथमिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र आहे.

सेप्टिक टँकचा आकार, वापरणाऱ्यांची संख्या आणि पाण्याच्या वापराच्या सवयी यावर अवलंबून असले तरी, साधारणपणे प्रत्येक 3 वर्षांत एकदा साफ करणे आवश्यक आहे. जास्त वापर असल्यास लवकर साफ करावे लागू शकते.

खालील चिन्हे दिसल्यास सेप्टिक टँक साफ करण्याची गरज असू शकते:१.शौचालयातून पाणी हळू जाणे किंवा तुंबणे. २.सिंक किंवा बाथरूममधून दुर्गंधी येणे.३.ड्रेनेज पाईपजवळ किंवा सेप्टिक टँकच्या आसपास हिरवीगार, अतिरिक्त वाढलेली गवत दिसणे.४.सेप्टिक टँकच्या झाकणाजवळ पाणी साचलेले दिसणे.

सोलापूरमहानगरपालिकेकडून सेप्टिक टँक साफ करण्यासाठी व्हॅक्युम ट्रकला (वॅक्यूम एम्प्टीअर) वापरले जाते. हा ट्रक टाकीतील गाळ आणि सांडपाणी शोषून घेतो आणि नंतर ते सोलापूरमहानगरपालिकेच्यामलनिःस्सारणप्रक्रियाकेंद्रावर शास्त्रोक्तपद्धतीने विल्हेवाटीसाठी घेऊन जातो.

कचरा व्यवस्थापन

सेप्टिक टँक साफ करण्याकरितासोलापूरशहराच्याहद्दीतीतर.रु. १२००प्रतिखेप(३०००लिटरकरिता) वसोलापूरशहराच्याहद्दीच्याबाहेरअसल्यासर.रु. २४००प्रतिखेप(र.रु. १२प्रतिकि.मी.). सेप्टिक टँक सोलापूरशहराच्याहद्दीतीतअसेलतरत्यास०४दिवसलागूशकतेवसोलापूरशहराच्याहद्दीच्याबाहेरअसल्यासतरत्यास०७दिवसांपर्यंतलागूशकते

सेप्टिक टँकमध्ये खालील पदार्थ टाकणे टाळावे, कारण ते टाकीच्या कार्यक्षमतेला बाधा आणू शकतात:तेल, ग्रीस आणि चरबी.प्लास्टिक, कापड किंवा न विरघळणारे पदार्थ.औषधे आणि रसायने.जास्त प्रमाणात डिटर्जंट किंवा ब्लीच.

सेप्टिक टँक साफ केल्यानंतर पाणी वापरण्याआधी किमान 2 ते 3 तासांची प्रतीक्षा करा,जेणेकरून टँक पूर्णपणे ड्राय होईल.

१.पाण्याची बचत करा, ज्यामुळे टँकवर जास्त भार येणार नाही. २.टँकमध्ये अनावश्यक वस्तू टाकणे टाळा.३.योग्य वेळी व्यावसायिक एजन्सीकडून तपासणी आणि स्वच्छता करून घ्या.४.टँकच्या क्षेत्रावर जड वस्तू किंवा वाहने उभी करू नका.

मोबाइल टॉयलेट

मोबाइल टॉयलेट म्हणजेच फिरते शौचालय ही एक पोर्टेबल टॉयलेट सुविधा आहे, जी विविध स्थळी सुलभपणे वापरता येते. हे लोकांना सार्वजनिक ठिकाणी, खासकरून उत्सव, कार्यक्रम किंवा इतर मोठ्या जमावात स्वच्छतेची सुविधा प्रदान करते.

सोलापूर महानगरपालिकेच्या साखर पेठ येथील सफाई अधीक्षक (वाहन) कार्यालयात समक्ष जाऊन शुल्क व अनामत रक्कम भरून नोंदणी करावी.

मोबाइल टॉयलेटची मागणी किमान ८दिवस अगोदर केली पाहिजे, म्हणजेच त्याची उपलब्धता सुनिश्चित केली जाऊ शकते.

मोबाइल टॉयलेट १दिवसा करिता वापरण्यासाठी र.रु. ५०००/- इतके शुल्क आहे. एका दिवसा पेक्षा जास्त वापरण्यासाठी लागत असेल तर प्रति दिवसर.रु. २५००/- इतके शुल्क आहे. तसेच त्या सोबतर.रु. ५०००/- इतकी अनामत रक्कम (रिफंडेबल) म.न.पा. कडे जमा करावी लागणार.