ताज्या घडामोडी
निवडणूक २०२५ -प्रभाग रचना | घंटागाडी लोकेशनचा मागोवा घ्या | पाणीपुरवठा वेळापत्रक

राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम

सोलापूर महानगरपालिकेकडून शहरातील धूळ आणि प्रदुषण कमी करण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, सदर उपक्रमाअंतर्गत रस्ते सुधारणा, दुभाजक व चौक सुशोभिकरण, हरित पट्टे तयार करणे, पाण्याचे कारंजे बनविणे अशी कामे हाती घेण्यात आली असून, या योजनेअंतर्गत एकूण निधी र.रु.46 कोटी मंजूर असून यामध्ये 25 किलोमिटरचे रस्त्यांचे कामकाज पूर्ण झाले आहे, महत्त्वाच्या 8 ठिकाणी सुशोभिकरणाची कामे पूर्ण झालेली आहेत. तसेच 08 किलोमिटर रस्त्यांच्या दुभाजकांचे सुशोभिकरणाचे कामकाज पूर्ण झालेले आहे. सदर कामकाजामूळे सदर कामकाजाची प्रगती व परिणाम लवकरच नागरीकांना दिसतील. राष्ट्रीय स्वच्छ वायु उपक्रम अंतर्गत 13 सी. एन. जी. वाहने म.न.पा.च्या सेवेत दाखल झाली आहेत.