दवाखाने
सोलापूर महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली आजला 7 दवाखाने ओ.पी.डी तत्वावर सुरु असून, त्या सर्व दवाखान्याकडे येणाऱ्या रुग्णांच्या प्राथमिक औषधोपचाराकरिता नाममात्र रु.10/- इतके केस पेपर शुल्क आकारुन त्यांना आवश्यक त्या प्राथमिक वैद्यकीय सुविधा पुरविणेत येतात. मा.शासनाचे धोरणानुसार सुविधा मोफत स्वरुपात उपलब्ध करुन देणेत येत आहेत.
1) उंब्रजकर वस्ती दवाखाना
2) शहर दवाखाना
3) साखर पेठ दवाखाना
4) आयुर्वेद दवाखाना
5) शास्त्री नगर दवाखाना
6) जोडभावी पेठ दवाखाना
7) रविंद्रनाथ टागोर दवाखाना
प्रसुतीगृहे
सोलापूर महानगरपालिका अंतर्गत सध्या 7 प्रसुतीगृहे कार्यान्वित आहेत. या प्रसुतीगृहांमधून शहरातील महिलांना प्रसुतीपूर्व व प्रसुतीपश्चात सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा पुरविणेत येत आहेत. सद्यस्थितीत राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम अंतर्गत गर्भवती महिलांना प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात सर्व प्रकारच्या सुविधा मोफत स्वरुपात पुरविणेत येत आहेत.
रुग्णवाहिका भाडे
सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आजमितीस एकूण 12 रुग्णवाहिका कार्यरत आहेत. या रुग्णवाहिकापैकी 8 रूग्णवाहिका या प्रसुतीगृहाकरिता व 4 रुग्णवाहिका यु.पी.एच.सी.करिता वापरात आहेत.
| सेवा |
शुल्क |
| शहरामध्ये रुग्णवाहिका |
₹ 450/- |
| शहराबाहेर 25 किलोमिटरच्या पुढे (प्रति किलोमिटर) |
₹ 13/- |
शववाहिका भाडे
सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आजमितीस एकूण 4 शववाहिका कार्यरत आहेत व कैलास रथ शहरातील नागरीकांच्या सोयीसाठी उपलब्ध करुन देणेत आलेल्या आहेत.
| सेवा |
शुल्क |
| शहरामध्ये शववाहिका |
₹ 450/- |
| शहराबाहेर 25 किलोमिटरच्या पुढे (प्रति किलोमिटर) |
₹ 13/- |
विद्युत, गॅस दाहिनी
सोलापूर शहरातील सिव्हिल हॉस्पीटल व इतर हॉस्पीटलमध्ये व घरी मृत्यू पावलेल्या नागरिकांचे अंत्यसंस्कार हे मोदी व रूपाभवानी येथील विद्युत दायिनीमधून अंत्यसंस्कार करण्यात येतात.
| सेवा |
शुल्क |
| विद्युत दाहिनी |
₹ 500/- |
| गॅस दाहिनी (पदमशाली स्मशानभूमी) |
₹ 2000/- |
नर्सिंग होम नोंदणी प्रमाणपत्र देणे
सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाकडून शहरातील नर्सिंग होम / हॉस्पीटल / रूग्णालय यांना महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी अधिनियम 1949 अंतर्गत ऑनलाईन कार्यप्रणालीद्वारे 3 वर्ष कालावधीकरिता विहित शुल्क स्विकारून नोंदणी प्रमाणपत्र देणेची कार्यपध्दत कार्यान्वित आहे. सदर नोंदणी प्रमाणपत्राकरिता 3 वर्ष कालावधीसाठी र.रू.10500/- मा.शासन निर्णय दि.6 जुलै 2019 प्रमाणे शुल्क आकारणी करणेत येत आहे.
नर्सिंग स्कूल प्रशिक्षण
मा.शासन व प्रशासक ठ.क्र.68 नुसार सोलापूरातील खाजगी नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थ्यांना म.न.पा.आरोग्य विभागाकडून प्रशिक्षण देणेकरिता प्रति विद्यार्थी प्रति दिवस 200/- प्रमाणे प्रसुतीगृहाकडे व ना.आ.केंद्राकडे र.रू.133/- प्रमाणे शुल्क स्विकारले जाते.