सोलापूर महानगरपालिका मुख्यपृष्ठ

सोलापूर महानगरपालिका

महाराष्ट्र सरकार

मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण

प्रसिद्ध दिनांक: २१ जुलै २०२६

पुनरीक्षणाबद्दल

विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) ही मतदार याद्यांमधल्या त्रुटी दूर करून ती निर्दोष करण्याची प्रक्रिया आहे. प्रत्येंक पात्र नागरिकाची मतदार यादीत योग्य नोंद होईल. यामुळे सुनिश्चिती होते.

  • विद्यमान मतदार यादीतील मतदारांची पडताळणी केली जाते
  • अधिकारी स्वतः घरोघरी भेट देऊन पडताळणी करतात
  • २००२-२००४ च्या मतदार याद्या आधारभूत मानल्या जातात
  • दि.०१-२०-२०२६ अर्हता दिनांकानुसार पात्र मतदारांची नोंद होईल
  • नवीन मतदार अर्ज क्र. ६ व घोषणापत्र भरून नोंदणी करू शकतात
  • निवडणुका पारदर्शकपणे पार पाडण्यात मदत होते

विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) का गरजेचे आहे?

  • अचूकता राखणे: मतदार यादीची अचूकता राखण्यासाठी ही प्रक्रिया आवश्यक आहे.
  • २४ वर्षांनंतर पडताळणी: २००२ नंतर ही प्रक्रिया झालेली नसल्याने पडताळणी करणे अत्यावश्यक आहे.
  • स्थलांतरणाचा परिणामः शहरीकरण व रोजगारामुळे मोठ्या प्रमाणावर स्थलांतरण झाले आहे.
  • अपात्र नावे वगळणे: अपात्र, मृत व दुबार नावे मतदार यादीतून वगळणे आवश्यक आहे.




🔗 इतर सरकारी संकेतस्थळे