सोलापूर महानगरपालिका मुख्यपृष्ठ

सोलापूर महानगरपालिका

महाराष्ट्र सरकार

मुख्यपृष्ठ
मदत पाहिजे का?
⌨ कळफलक नेव्हिगेशन सक्षम
अंतिम अद्यतन:

विभागीय कार्यालय क्र. ५

संपर्क माहिती

सोलापूर महानगरपालिका
इंद्रभुवन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,
रेल्वे लाईन्स, सोलापूर - ४१३००१
कार्यालयीन वेळ: सकाळी ९:४५ - संध्याकाळी ६:१५ (सोमवार - शुक्रवार)

विभागाची ओळख

विभागीय कार्यालय क्र. ५ हे सोलापूर महानगरपालिकेचे महत्त्वाचे विभागीय कार्यालय आहे जे पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते देखभाल आणि इतर नागरी सेवांसाठी जबाबदार आहे. हे कार्यालय नागरिकांना प्रशासकीय सेवा पुरवण्यासाठी सर्वात मोठे संपर्क केंद्र म्हणून काम करते.

विभागाची मुख्य कार्ये

  • पाण्याच्या नळाला जोडणी देणे
  • सांडपाणी जोडणी देणे
  • अनधिकृत नळ जोडणीबाबत तक्रार
  • पाण्याच्या मीटरमध्ये बिघाड झाल्याची तक्रार
  • कमी पाण्याच्या दाबाबाबत तक्रार
  • रस्ता तोडण्याची परवानगी देणे
  • पाण्याच्या गुणवत्तेबाबत तक्रार
  • मॅनहोल कव्हरची देखभाल
  • रस्त्यांवर खड्डे भरणे
  • सार्वजनिक स्वच्छता व्यवस्थापन

माहितीचा अधिकार

फाईल माहिती स्वरूप आकार भाषा तारीख क्रिया

माहितीचा अधिकार कलम १ ते १७

माहितीचा अधिकार अधिनियम कलम १-१७ मराठीत

पीडीएफ १.२ एमबी मराठी जानेवारी १५, २०२३

नियम आणि कायदे

  • महाराष्ट्र महानगरपालिका कायदा, १९४९ च्या पाणीपुरवठा तरतुदींनुसार सेवा
  • महाराष्ट्र महानगरपालिका कायदा, १९४९ च्या सांडपाणी व्यवस्थापन तरतुदींनुसार सेवा
  • महाराष्ट्र महानगरपालिका कायदा, १९४९ च्या रस्ते बांधकाम तरतुदींनुसार सेवा
  • सार्वजनिक स्वच्छता नियम, २०००
  • पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ अंतर्गत तरतुदी

विभागीय कामाच्या प्रक्रिया

नळ जोडणी प्रक्रिया

  1. अर्जदाराने अर्ज सादर करणे
  2. कर विभागातील कर निरीक्षकांचे मत
  3. विभागीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंता तपासणी
  4. मंजुरीसाठी विभागीय अधिकारी / PHE विभागाकडे पाठवणे
  5. अंतिम मंजुरी आणि कनेक्शन दिले जाणे

रस्ता खोदाई प्रक्रिया

  1. अर्जदाराने शहर अभियंता कार्यालयात अर्ज सादर करणे
  2. विभागीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंत्याची तपासणी
  3. शहर अभियंत्याकडे मंजुरी प्रस्ताव
  4. मंजुरीनंतर परवानगी दिली जाणे

ड्रेनेज कनेक्शन प्रक्रिया

  1. संबंधित विभागाकडे अर्ज सादर करणे
  2. कनिष्ठ अभियंत्याची तांत्रिक तपासणी
  3. विभागीय अधिकारी / PHE ड्रेनेज विभागाची मंजुरी
  4. कनेक्शन दिले जाणे

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

पाणी कनेक्शन

नळ जोडणीसोलापुर महानगरपालिका द्वारे दिली जाणारी कायदेशीर पाणी पुरवठा सेवा आहे.

अ) घरगुती वापरासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे १)मालकी दस्तऐवज (भाडेकरू असल्यास एनओसी), २)रेशनकार्ड /आधारकार्ड/रहिवास पुरावा व इंडेक्स व उतारा सोसायटी/इतर रहिवासी यांचे ना हरकत पत्र व सदनिका करारनामा . ३) मिळकत करामधील पाणीपट्‌टी व नळजोडाचे मीटरप्रमाणे होणारी पाणीपट्‌टी दोन्ही म.न.पा. कोषागारात विना तक्रारी भ्ररणा करणार याबाबत नोटराईज्ड हमीपत्र. ४)घर-कर पावती नाहरकत दाखला. ब) बिगर घरगुती वापरासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे अ. क्र. १ ते ४ ची कागदपत्रे १) शॉप अॅक्ट लायसेन्स्‌.२) इंडेक्स टू व दुकान खरेदीबाबत कागदपत्रे.३) दुकान/कार्यालय भाडयाने घेतल्यास भाडे करार, मुळ मालकाचे संमतीपत्र मुळ मालकाचे पाणी बीलाबाबत हमीपत्र.

उपभुखंड / सदनिका मालक किंवा भाडेकरू (मालकाच्या परवानगीने) वैध कागदपत्रे सादर करून अर्ज करू शकतात.

ऑनलाईन फॉर्म भरून आवश्यक कागदोपत्री सादर करावी. नवीन नळजोडकरिता करावयाचा अर्ज सोलपुर महानगरपालिका, www.solapurcorporation.gov.in या वेबसाईटवर अर्ज सादर करता येईल.

ड्रेनेज जोडणी

सोलापुर महानगरपालिका द्वारे दिलेली ड्रेनेज-लाईन (सीवर) प्रणालीशी जोडणी आहे

जागा / सदनिका मालक किंवा भाडेकरू (मालकाच्या परवानगीने) वैध कागदपत्रे सादर करून अर्ज करू शकतात.

१)ऑनलाइन फॉर्म भरून आवश्यक कागदोपत्री सादर करावी. २)नवीन ड्रेनेज कनेक्शन करिता करावयाचा अर्ज सोलपुर महानगरपालिका,www.solapurcorporation.gov.in या वेबसाईटवर अर्ज सादर करता येईल.

अ) जागा / सदनिका मालकी दस्तऐवज, ब) पत्ता पुरावा, आधार कार्ड, क) बांधकाम परवानगी, नकाशा (साइट प्लॅन).

परवाना अथवा ना हरकत प्रमाणपत्र

लाईन्स सर्व्हिसेस या टॅबमध्ये न्यु लायसन्स रजिस्ट्रेशन व एन. ओ. सी. फॉर लायसन्सड बिझनेस या टॅबवर क्लिक केल्यासा सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध आहे.

मागणी अर्ज भरताना दाखल केलेल्या मोबाईल क्रमांकावर व ई-मेल वर प्रकरण मंजूरीचा संदेश प्राप्त होतो.

मागणी अर्ज भरताना दाखल केलेल्या मोबाईल क्रमांकावर व ई-मेल वर शुल्क भरणेचा संदेश प्राप्त झाल्यानंतर त्यासोबत दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यास शुल्क भरण्याकरीता ऑनलाईन पर्याय उपल्बध होतात. (डेबिट/क्रेडिक कार्ड, इंटरनेट बँकींग व युपीआय द्वारे) त्यानुसार शुल्क भरणे.

ऑनलाईन कार्यप्रणालीवर शुल्क भरल्यानंतर परवाना रिप्रिंट या टॅब वर क्लिक करून अर्ज क्र. व मोबाईल नंबर नोंदविल्यास परवाना प्रत मिळते. तसेच ना हरकत प्रमाणपत्र प्रत नवीन टॅब मध्ये उपलब्ध होते. (ना हरकत प्रमाणपत्र ओपन होण्यासाठी पॉअप चालू ठेवावे.)





🔗 इतर सरकारी संकेतस्थळे