महाराष्ट्र सरकार
🚀 महापालिकेच्या सर्व सेवा व्हॉट्सॲपवर उपलब्ध!
सरकारी सेवा आता व्हॉट्सॅपवर उपलब्ध!
"Hi" मेसेज पाठवा सुरू करण्यासाठी
विभागीय कार्यालय क्र. १ हे सोलापूर महानगरपालिकेच्या झोनल व्यवस्थापनाचे महत्त्वाचे केंद्र आहे. हे कार्यालय पाणी पुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते दुरुस्ती, स्वच्छता व्यवस्थापन आणि इतर सार्वजनिक सुविधांची देखरेख करते.
माहितीचा अधिकार अधिनियम कलम १-१७ मराठीत
PDF लोड होत आहे...
हा PDF नवीन विंडोमध्ये उघडेल. आपण डाउनलोड करू इच्छिता?
नळ जोडणीसोलापुर महानगरपालिका द्वारे दिली जाणारी कायदेशीर पाणी पुरवठा सेवा आहे.
अ) घरगुती वापरासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे १)मालकी दस्तऐवज (भाडेकरू असल्यास एनओसी), २)रेशनकार्ड /आधारकार्ड/रहिवास पुरावा व इंडेक्स व उतारा सोसायटी/इतर रहिवासी यांचे ना हरकत पत्र व सदनिका करारनामा . ३) मिळकत करामधील पाणीपट्टी व नळजोडाचे मीटरप्रमाणे होणारी पाणीपट्टी दोन्ही म.न.पा. कोषागारात विना तक्रारी भ्ररणा करणार याबाबत नोटराईज्ड हमीपत्र. ४)घर-कर पावती नाहरकत दाखला. ब) बिगर घरगुती वापरासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे अ. क्र. १ ते ४ ची कागदपत्रे १) शॉप अॅक्ट लायसेन्स्.२) इंडेक्स टू व दुकान खरेदीबाबत कागदपत्रे.३) दुकान/कार्यालय भाडयाने घेतल्यास भाडे करार, मुळ मालकाचे संमतीपत्र मुळ मालकाचे पाणी बीलाबाबत हमीपत्र.
उपभुखंड / सदनिका मालक किंवा भाडेकरू (मालकाच्या परवानगीने) वैध कागदपत्रे सादर करून अर्ज करू शकतात.
ऑनलाईन फॉर्म भरून आवश्यक कागदोपत्री सादर करावी. नवीन नळजोडकरिता करावयाचा अर्ज सोलपुर महानगरपालिका, www.solapurcorporation.gov.in या वेबसाईटवर अर्ज सादर करता येईल.
सोलापुर महानगरपालिका द्वारे दिलेली ड्रेनेज-लाईन (सीवर) प्रणालीशी जोडणी आहे
जागा / सदनिका मालक किंवा भाडेकरू (मालकाच्या परवानगीने) वैध कागदपत्रे सादर करून अर्ज करू शकतात.
१)ऑनलाइन फॉर्म भरून आवश्यक कागदोपत्री सादर करावी. २)नवीन ड्रेनेज कनेक्शन करिता करावयाचा अर्ज सोलपुर महानगरपालिका,www.solapurcorporation.gov.in या वेबसाईटवर अर्ज सादर करता येईल.
अ) जागा / सदनिका मालकी दस्तऐवज, ब) पत्ता पुरावा, आधार कार्ड, क) बांधकाम परवानगी, नकाशा (साइट प्लॅन).
लाईन्स सर्व्हिसेस या टॅबमध्ये न्यु लायसन्स रजिस्ट्रेशन व एन. ओ. सी. फॉर लायसन्सड बिझनेस या टॅबवर क्लिक केल्यासा सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध आहे.
मागणी अर्ज भरताना दाखल केलेल्या मोबाईल क्रमांकावर व ई-मेल वर प्रकरण मंजूरीचा संदेश प्राप्त होतो.
मागणी अर्ज भरताना दाखल केलेल्या मोबाईल क्रमांकावर व ई-मेल वर शुल्क भरणेचा संदेश प्राप्त झाल्यानंतर त्यासोबत दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यास शुल्क भरण्याकरीता ऑनलाईन पर्याय उपल्बध होतात. (डेबिट/क्रेडिक कार्ड, इंटरनेट बँकींग व युपीआय द्वारे) त्यानुसार शुल्क भरणे.
ऑनलाईन कार्यप्रणालीवर शुल्क भरल्यानंतर परवाना रिप्रिंट या टॅब वर क्लिक करून अर्ज क्र. व मोबाईल नंबर नोंदविल्यास परवाना प्रत मिळते. तसेच ना हरकत प्रमाणपत्र प्रत नवीन टॅब मध्ये उपलब्ध होते. (ना हरकत प्रमाणपत्र ओपन होण्यासाठी पॉअप चालू ठेवावे.)