वैयक्तिक काळजी व खबरदारी (सविस्तर)
🌞 १. दुपारी 12 ते 4 दरम्यान बाहेर जाणे टाळा — अतिशय महत्वाचे काम नसल्यास प्रखर उन्हात फिरू नका.
💧 २. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवा — तहान लागली नसली तरीही भरपूर पाणी घ्या.
🧢 ३. बाहेर जाताना डोके आणि कान झाकून घ्या — टोपी किंवा कापडाचा वापर करा.
☕ ४. चहा, कॉफी, कॅफीनयुक्त पेये टाळा — शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.
🐄 ५. पशु / प्राण्यांची काळजी घ्या — जनावरांना सावलीत बांधा, पुरेसे पाणी द्या.
🚑 ६. आपत्कालीन मदत — उष्माघात लक्षणे दिसल्यास 108 वर त्वरित कॉल करा.
तातडीची मदत : डायल 108